चाळीसगावचे चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार प्रदान


Chalisgaon Painter Poet Dinesh Chavan Awarded State Level Kalabhushan Award चाळीसगाव : शहरातील चित्रकार कवी साहित्यिक दिनेश चव्हाण यांना त्यांच्या कला साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल मानवता बहुउद्देशीय संस्था, धुळे यांच्यातर्फे अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय कवी संमेलनात राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
संमेलनाध्यक्ष तथा जेष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, कवी संमेलनाध्यक्ष शाहीर नानाभाऊ पाटील, जितेंद्र बहारे, सहावे अखिल भारतीय अहिराणी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष रमेश आप्पा बोरसे, खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ.सदाशिव सूर्यवंशी, ज्रूेष्ठ साहित्यिक व पत्रकार बी.एन. चौधरी, साहित्यिक संजय धनगव्हाळ यांच्याहस्ते शाल श्रीफळ ट्रॉफी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या संमेलनात त्यांनी आपली अहिराणी बहारदार रचना ‘माय’सादर करून महिला वर्गाची दाद मिळवली. चित्रकार दिनेश चव्हाण यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !