जळगावात वाहनांच्या काचा फोडून लूट : टोळीचा संशय ; 75 हजारांचा ऐवज लांबवला


Looting by breaking the windows of vehicles in Jalgaon : Suspect gang; The compensation of 75 thousand was extended जळगाव : शहरातील चित्रा चौकातील उभ्या चारचाकीच्या काचा फोडत चोरट्यांनी 12 हजारांची रोकड लांबवल्याची घटना सोमवारी समोर आल्यानंतर याच दिवशी शहरातील स्टेडीयम परीसरातील मणियार सुपर शॉपीजवळ देखील असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत शेतकरी तरुणाची 42 हजारांची रोकड, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा एकूण 75 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

टोळी कार्यरत झाल्याचा संशय
नंदगाव, नांद्रा येथील अमोल कारभारी पाटील हा तरुण सोमवारी सकाळी चारचाकी (एम.एच.48 पी.9710) ने बहिणीच्या वैद्यकीय तपासणीसाठी जळगावात आला होता. बहिणीची सासू व सासरे हे आडगाव येथून बसने नवीन बसस्थानक येथे उतरल्याने त्यांनाही सोबत घेवून अमोल हा खासगी रूग्णालयात गेला. रुग्णालयातील काम आटोपून सोमवारी दीड वाजेच्या सुमारास ते ड्रायफ्रुट घेण्यासाठी स्टेडीयम परीसरातील मणियार सुपर शॉपीमध्ये आला असता दुकानाच्या बाजूलाच कार पार्क करण्यात आली मात्र चोरट्यांनी कारची मागची काच फोडून बॅग लांबवली. या बॅगेत 42 हजारांची, 25 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व मोबाईल तसेच दुसर्‍या बॅगेत महत्वाचे कागदपत्र होते. तरुणाने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा करण्यात आला. तपास पोलीस नाईक शरीफ शेख करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !