दिड हजारांची लाच घेताना टेक्नीशीयनसह पंटर जाळ्यात : फत्तेपुरात जळगाव एसीबीच्या कारवाईने खळबळ


Punter caught in net with technician for taking bribe of half a thousand : Jalgaon ACB’s action stirs excitement in Fatehpur जळगाव :पत्र्याच्या शेडमध्ये विद्युत मीटर बसवून देण्यासाठी दिड हजारांची लाच मागून ती स्वीकारताना फत्तेपूर, ता.जामनेर येथील वीज कंपनीच्या टेक्नीशीयनसह खाजगी पंटराला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी दिड वाजता अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. सिनीयर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार (रा.फत्तेपूर, ता.जामनेर) व खाजगी इसम कलीम सलीम तडवी (27, देऊळगाव, ता.जामनेर) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.

 

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाणे. एएसआय .दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक जनार्दन चौधरी, नाईक किशोर महाजन, नाईक सुनील वानखेडे, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने यशस्वी केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !