घर उघडे असल्याची संधी चोरट्याने साधली : 25 हजारांचा लॅपटॉप चोरीला
जळगाव : शहरातील नेहरू नगरातून एका तरुणाच्या उघड्या घरातून 25 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
मोहित जयप्रकाश दारा (25, मोहाडी रोड, नेहरू नगर, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरदार आहे. शुक्रवार, 14 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच ते साडे सहा वाजेच्या दरम्यान घर उघडे असतांना अज्ञात चोरट्याने घराततून 25 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप लांबवला. र मंगळवारी एमआयउीसी पोलिसात तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक सुधीर सावळे करीत आहे


