हॉटेल बारच्या तक्रारीनंतर मालकाने जळगावातील दाम्पत्यास केली मारहाण


जळगाव : जळगाव शहरातील पार्वती नगराजवळील सनराईज बार हॉटेल संदर्भात पोलिसात तक्रार दिल्याच्या वादातून हॉटेल मालकाने दाम्पत्याला शिविगाळ व मारहाण करून धारदार वस्तूने वार करून जखमी केले. ही घटना सोमवारी रात्री 11.30 वाजता घडली. हॉटेल चालक रवींद्र सुधाकर जगताप (52, म्युन्सीपल कॉलनी, जळगाव) याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दाम्पत्याला शिविगाळ करीत मारहाण
मनोहर वासुदेव बंडाळे (54, पार्वती नगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या पत्नीने हॉटेल बारच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून हॉटेल मालक रवींद्र सुधाकर जगताप याने सोमवार, 17 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता मोहन बेंडाळे व त्यांची पत्नी यांना शिवीगाळ करत मारहाण केली तसेच धारदार वस्तूने मोहन बेंडाळे यांना जखमी केले. यासंदर्भात मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता संशयित आरोपी रवींद्र सुधाकर जगताप यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !