पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणार्‍यांचा फाशी देवून खून : पसार आरोपी चाळीसगावात पोलिसांच्या जाळ्यात

चाळीसगाव पोलिसांची कोम्बिंगदरम्यान कारवाई : दुचाकीस्वारांवरही कारवाई


Murder due to immoral relationship : Suspect in Chalisgaon police net चाळीसगाव : पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणार्‍या तरुणाचा खून करून पसार झालेल्या आरोपीच्या चाळीसगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन मुसक्या आवळल्या असून त्यास पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

खून करीत काढला पळ
19 एप्रिल रात्री 11 ते 20 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजेच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आली. संशयित तुळशीराम बुधा सोनवणे (32, रा.पिंपळकोठे, ता.बागलाण, जि.नाशिक) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवणार्‍या प्रवीण सोनवणे (पिंपळकोठे, ता.बागलाण) याचा गळफास देवून खून केला होता. याबाबत जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल असून गुन्ह्यानंतर पसार झाल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन जणांना वारंट बजावण्यात आले. तर जुगार खेळणार्‍या सहा जणांवर कारवाई करण्यात आली, वाहनांचे नियम मोडणार्‍या 20 दुचाकीधारकांवर करवाई करण्यात येवून 14 हजार 500 रुपयांची दंड वसुल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, भूषण पाटील, विजय पाटील, रवींद्र बच्चे, निलेश पाटील, अमोल भोसले, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, शरद पाटील यांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !