नशिराबादला कर्तव्यावरील पोलिसाला धक्काबुक्की : त्रिकूटाविरोधात गुन्हा


Nashirabad police on duty assaulted : Crime against the trio नशिराबाद : दुचाकीवरून घोषणा देणार्‍या युवकांना पोलिसाने अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कर्तव्यावरील पोलिसाला जमिनीवर ढकलून त्रिकुटाने पळ काढल्याची घटना शहरातील लतीफशाह बाबा दर्ग्याजवळ 18 रोजी रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रिकूटाविरोधात गुन्हा दाखल
नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाळू त्र्यंबक पाटील यांच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 18 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता लतीफशबाबा दर्गा येथे ड्यूटीवर असतांना भवानी नगरातील राम मुकेश करोसीया, शुभम विलास मोरे आणि एक अनोळखी तरूण हे दुचाकी (एम.एच.27 ए.बी.1506) वरून जात असतांना मोठ-मोठ्याने घोषणा देत होते. यावर पोलीस कर्मचारी बाळू पाटील यांनी हटकले असता पाटील यांना धक्का देण्यात आल्याने ते जमिनीवर पडल्याने शासकीय कामाता अडथळा निर्माण झाला. पोलीस कर्मचार्‍याने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बुधवारी रात्री 10 वाजता संशयित आरोपी राम मुकेश करोसीया, शुभम विलास मोरे आणि एक अनोळखी तरूण या तिघांविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !