आसोदा गोळीबाराने हादरले : पूर्व वैमनस्यातून कुविख्यात चिंग्याने एकावर झाडल्या तीन गोळ्या : सुदैवाने तरुण बचावला


Asoda rocked by firing : Notorious Chingya fired three shots at one from East enmity : Fortunately youth survived जळगाव : खुनातील संशयित तथा पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या चिंग्याने आसोद्यातील हॉटेलबाहेर बसलेल्या तरुणावर पूर्व वैमनस्यातील वादातून तीन गोळ्या झाडल्या मात्र मिस फायर झाल्याने व तरुणाने सतर्कता दाखवल्याने तरुणाचे प्राण वाचले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री आसोदा गावाजवळील आर्या हॉटेलबाहेर घडली. गोळीबाराच्या घटनेने जळगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा व जळगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. चिंग्या उर्फ चेतन सुरेश आळंदे (30, गणेशवाडी, पांडे चौक, जळगाव) व केयूर कैलास पंदारे (30, शिवाजी नगर, जळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत तर योगेश दिगंबर कोल्हे (31, आसोदा) असे गोळीबारातून बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव : पुंगळ्या जप्त
आसोदा येथे गोळीबार झाल्याची महिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस स्टेशन चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व सहकार्‍यांनी धाव घेत घडला प्रकार जाणून घेतला. यावेळी पोलिसांच्या पथकाने हॉटेल आर्याच्या परीसरातून झाडण्यात आलेल्या गोळीच्या तीन पुंगळ्या जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर
अटकेतील चेतन उर्फ चिंग्या हा गुन्हेगारी पार्श्वभुमीचा असून न्यायालयाने त्याला जळगाव शहर व जळगाव तालुक्यात येण्यास बंदी घातली असून त्यानंतरही तो जळगावात येवून दहशत निर्माण करीत असल्याचे उघड झाले आहे. खुनाच्या गुन्ह्यात डिसेंबर महिन्यात चिंग्या जामिनावर आल्याची माहिती आहे तर गोळीबारात बचावलेल्या योगेशवरही काही गुन्हे दाखल असून गणेशोत्सवात त्याला हद्दपार करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी त्याच्या हद्दपारीला स्थगिती दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !