पिंपळेसीमला जुना वाद उफाळला : दोघांना मारहाण, चौघांविरोधात गुन्हा


An old dispute erupted in Pimplesim: Two beaten up, crime against four धरणगाव  : जुना वाद उफाळून आल्यानंतर चौघांनी दोघा भावंडांना मारहाण केली तर कुटूंबातील दोघा सदस्यांना अश्लील शिविगाळ केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंपळेसीम येथे 19 रोजी रात्री साडेसात वाजता घउली. या प्रकरणी गुरुवारी दुपारी एक वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
संजय लिलाचंद पाटील (43, पिंपळेसीम, ता.धरणगाव) हे आई व पत्नी यांच्यासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 19 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील संशयित मणीलाल रूपसिंग पवार, दीपक मणीलाल पवार, दीपक राजाराम पवार, जितेंद्र मणीलाल पवार यांनी संजय पाटील यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर एकाने लाकडी दांड्याने वार करून दुखापत केली. भांडण सुरू असताना संजय पाटील यांचा भाऊ ज्ञानेश्वर पाटील हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालादेखील बेदम मारहाण करण्यात आली तसेच संजय पाटील यांची पत्नी आणि आई यांना अश्लिल शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर संजय पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली, त्यानुसार त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी एक वाजता चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोळी करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !