उघड्या घरातून 80 हजारांची रोकड लांबवली : जळगावात खळबळ
80,000 cash extended from an open house : Excitement in Jalgaon जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम असून उघड्या घरातून वृद्धाची 80 हजारांची रोकड लांबवण्यात आला असून या प्रकरणी एकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना शहरातील जगवानी नगरात 4 ते 8 एप्रिलदरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकावर तक्रारीत संशय
निवृत्ती नथू पाटील (80, रा.प्लॉट नंबर 13, जगवानीनगर, एमआयडीसी, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. 4 एप्रिल सायंकाळी पाच ते 8 एप्रिलच्या दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून 80 हजार रुपयांची रोकड संशयित पल्लवी उर्फ सोनी प्रवीण हिवाळे (हिवरा, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) हिने चोरून नेल्याच्या संशय निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार 20 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता निवृत्ती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.


