सातबारा उतार्‍यासाठी 12 हजारांची लाच : भुसावळातील कोतवालासह पंटराला न्यायालयीन कोठडी


12,000 bribe for Satbara passage : Puntar Along with Kotwal in Bhusawal taken into judicial custody भुसावळ : शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीने मंगळवारी अटक केती होती. लाचखोरांना शुक्रवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयितांतर्फे जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर सोमवारी या अर्जावर युक्तीवाद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दोघा संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील 34 वर्षीय तक्रारदाराला स्वतःच्या नावाने दोन एकर शेतजमिनीची खरेदी केल्यानंतर सातबारा उतार्‍यावर नाव लावायचे असल्याने प्रकरण सादर केल्यानंतर कुर्‍हा मंडळाधिकारी योगीता पाटील यांनी त्रृटी काढून कोतवालांशी भेटण्यास सांगितले. कोतवालाने मंडळाधिकार्‍यांकडून काम देण्यासाठी 15 हजार रुपये सुरूवातीला मागून 12 हजारात तडजोड केली मात्र एसीबीकडे तक्रार होताच मंगळवारी दुपारी सापळा यशस्वी करण्यात आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. सुरूवातीला दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली व मुदत संपल्याने शुक्रवारी संशयिताना अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयीतातर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर आता सोमवार, 24 रोजी सुनावणी होणार असल्याने तो पर्यंत संशयीतांचा मुक्काम कारागृहात असणार आहे. संशयितांतर्फे अ‍ॅड.मनीष सेवलानी, अ‍ॅड.तुषार पाटील, अ‍ॅड.अनिल कुटे यांनी काम पाहिले.

मंडळाधिकार्‍यांचे ‘कानावर हात’
लाच प्रकरणात कुर्‍हेपानाचे येथील मंडळाधिकारी योगीता पाटील यांची शुक्रवारी जळगाव एसीबीकडे पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांनी चौकशी केली. यावेळी पाटील यांनी आपण तक्रारदाराला ओळखत असल्याचे सांगून लाच प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !