पारोळा हादरले : अटकेनंतर लॉकअपमध्ये संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न
Suspect’s suicide attempt in lockup in Parola जळगाव : पारोळा पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केलेल्या संशयिताने पोलीस लॉकअपमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी राहुल देविदास सरदार (रा.राजीव गांधी नगर पारोळा) या संशयिताविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकेच्या रागानंतर आत्महत्येचा प्रयत्न
राहुल उर्फ राजू देविदास पवार यास अटक केल्याचा राग आल्याने त्याने संतापाच्या भरात पारोळा पोलीस ठाण्यातील भिंतीवर डोके आपटून घेत गार्ड रुम मधील लोखंडी पलंगाच्या पट्टीत हात घालून जखम करुन घेतली. त्याला लागलीच कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गार्ड अंमलदार आशिष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहेत.


