अमळनेरच्या अल्हाद नगरात धाडसी घरफोडी


Daring burglary in Alhad Nagar of Amalner अमळनेर : अमळनेर शहरातील अल्हाद नगरात बंद घराला चोरट्यांनी टार्गेट करीत घरातील कपाटातून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून 30 हजार 400 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने लांबवला. या प्रकरणी शुक्रवारी सायंकाळी अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरे चोरट्यांना पर्वणी
विठ्ठल बारकू पाटील (38, अल्हाद नगर, अमळनेर) हा तरुण परीवारासह वास्तव्याला असून त्यांचे मूळ गाव अंजदे बुद्रुक येथील असल्याने तरुण गावाला गेल्यामुळे घर 18 एप्रिलपासून बंद होते. घर बंद असल्याच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड मिळून 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. त्यांचे घर उघडे असल्याचे लक्षात येताच त्यांचे शेजारी राहणारे योगेश तुकाराम माळी यांनी फोन करून विठ्ठल पाटील यांना माहिती दिली. विठ्ठल पाटील हे घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी अमळनेर पोलिसात धाव घेतली. विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !