जळगावात हद्दपार आरोपी धारदार सुर्यासह जाळ्यात
Deported accused net in Jalgaon midc police जळगाव : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी सुर्याच्या धाकावर दहशत निर्माण करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने जुनेद उर्फ बवाली युनूस शेख (रा.तांबापुरा, जळगाव) या लोखंडी सुर्यासह अटक केली आहे. रविवार, 22 एप्रिल रोजी जळगावच्या मेहरुण परीसरात बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम सुरू असताना संशयित उर्फ बवाली युनूस शेख हा आपल्या कब्जात सुरा बाळगून दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
संशयित एक वर्षांसाठी हद्दपार
सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, विशाल कोळी, राहुल रगडे आदींनी जुनेद यास ताब्यात घेत त्याच्या कब्जातून लोखंडी सुरा जप्त केला. जुनेद उर्फ बवाली युनूस शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.


