तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेवून या मी माझं नाव घेवून येतो : उद्धव ठाकरेंनी भर सभेत चॅलेंज


पाचोरा : मी इथे आल्यावर काही जणांनी घोषणा दिल्या, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. मी नाही रे बाबा त्यांचा बाप. असल्या गद्दार औलादी आपल्या असूच शकत नाहीत. यांना स्वतःचं काही नाही. बाप चोरणारे आहेत हे. ढेकणं मारायला तोफेची गरज नसते. हे ढेकणं तुमचं रक्त पिलेली ढेकणं आहेत. यांना मारायला फक्त एक बोट लागेल. आज माझ्याकडे काहीच नाही, त्यांनी शिवसेना नाव चोरले, धनुष्यबाण चोरल, माझे वडील चोरत आहेत मात्र माझं यांना खुलं आव्हान आहे तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेवून या मी माझं नाव घेवून निवडणूक रींगणात येतो, असे खुले चॅलेंजच उद्धव ठाकरेंनी येथे रविवारी झालेल्या विराट सभेत केले. आपल्यासमोर भाजपा आव्हान नाही तर राज्यात व केंद्रात असेपर्यंत होणारे नुकसान हे आव्हान असून ते कसे भरून काढायचे हा प्रश्न असल्याचे ठाकरे म्हणाले. राहुल गांधी यांनी अदानींवर प्रश्न विचारला अन खासदारकी घालवली, असेही त ेम्हणाले.

अब की बार बस झाले
ठाकरे आपल्या आक्रमक शैलीत म्हणाले की, मोदी पूर्वी म्हणायचे, महागाई कमी झाली की नाही झाली…पेट्रोलचे भाव कमी झाले की नाही झाले…आता ’अब की बार’ बस झालं. यांना ’आपटी बार’ दाखवावाच लागेल. तिकडे सत्यपाल मलिकांनी उरी हल्ल्याबाबत मोठी माहिती दिली. त्यांनी भ्रष्टाचाराची माहिती समोर आणली. त्यांच्या मागे सीबीआय लावली. काल-परवा काही जवान शहीद झाले. ते सोडून भाजप कर्नाटकच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. आज विरोधकांच्या मागे सीबीआय, ईडी लावली जात आहे. भाजपात येता की, तुरुंगात जाता. आमच्यात असले की, ते भ्रष्ट असतात आणि तुमच्यात आले की शुद्ध होतात.

या निवडणुकीसाठी आपले जवान मारले
सत्यपाल मलिक म्हणाले तसं, यांनी निवडणुकीसाठी जवान मारले असतील, तर अशा लोकांसाठी आपण आपले सुपूत्र यांच्यावर ओवाळून टाकायचे का? यांना किती दिवस चालवून घेणार? या भगव्यावर त्या चोरांचा अधिकार नाही. खंडोजी खोपडेच्या हातात भगवा शोधून दिसत नाही. यांना स्वतःच काही नाही, दुसर्‍यांच चोरावं लागतं, अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली.

मोदींचा मित्र लगेच श्रीमंत कसा ?
ते पुढे म्हणतात, राहुल गांधींनी अदानीवर प्रश्न विचारले, उत्तर कोण देणार? हा प्रश्न फक्त राहुल गांधींनाच नही, तर देशातील प्रत्येकाला पडतोय. शेतकरी म्हणतोय, आम्ही दिवसभर राब-राब राबतो आणि हा मोदींचा मित्र लगेच इतका श्रीमंत होतो. मिंध्ये सरकार म्हणतात, आमचं सरकार घेणारं नाही, देणारं आहे. तुम्ही काय दिलं? मी घरात बसून सरकार चालवतो असं म्हणतात, हो आम्ही चालवलं. मी घरात राहून चांगलं सरकार चालवलं, तुम्ही बाहेर फिरुन चालवता येत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !