जळगावात तरुणाची आत्महत्या : टोकाच्या निर्णयापूर्वी भावी पत्नीला केला व्हिडिओ कॉल
Suicide of youth in Jalgaon: Video call to future wife before extreme decision जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झालेल्या जळगावातील नाथवाडा भागातील 20 वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी तरुणाने भावी पत्नीशी व्हिडिओ कॉलवरून संभाषण केल्याची माहिती आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कितेश गौतम बागडे (20, नाथवाडा, सिंधी कॉलनीजवळ, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, तरुणाने आत्महत्या का केली? याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.
मे महिन्यात होणार होता विवाह
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी जवळील नाथवाडा येथे कितेश बागडे हा आपल्या परीवारासह वास्तव्याला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेणार्या कितेशचा दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला व नेहमी प्रमाणे रात्री 9 वाजता घराच्या दुसर्या मजल्यावर असतांना त्याने भावी पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला व नंतर गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार कितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणार्या तरुणांनी धाव घेवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणूका भंगाळे यांनी मयत घोषीत केले. कितेशने आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 27 मे रोजी कितेशचे लग्न होणार होते. परंतू त्याने टोकाचे निर्णय घेतल्याने बागडे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.. मयताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम दयाराम बागडे, लहान भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.


