जळगावात नोकरदाराचे घर फोडून दिड लाखांचा ऐवज लांबवला
Daring house burglary again in Jalgaon : One lakh 32 thousand was stolen जळगाव : शहरात चोर्या-घरफोड्यांचे सत्र कायम आहे. अनुराग स्टेट बँक कॉलनीतील नोकरदाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी 12 हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने मिळून एक लाख 32 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रविवारी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घर चोरट्यांना पर्वणी
बद्रीनाथ जवाहरलाल चौधरी (49, अनुराग स्टेट बँक कॉलनी, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बद्रीनाथ चौधरी हे शनिवार, 22 एप्रिल रोजी घर बंद करून बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत गोदरेज कपाटातून 34 ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार व 12 हजारांची रोकड असा एक लाख 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. बद्रीनाथ चौधरी हे रविवारी घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे उघड झाले. या संदर्भात त्यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.


