यावलच्या आठवडे बाजार भागातून दुचाकी लांबवली
यावल : शहरातील आठवडे बाजार भागात वड्री येथून आलेल्या एका इसमाची दुचाकी लांबवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर त्यांनी दुचाकी लावली होती. तेथून अज्ञात भामट्याने दुचाकी लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वड्री, ता.यावल येथील सुभाष गंगाधर पाटील हे शेतकरी आपली मोटरसायकल (क्रमांक एम. एच.19 बी एक्स. 9637) घेऊन यावल आले होते व त्यांनी आपली मोटरसायकल आठवडे बाजारभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या समोर लावली. अज्ञात चोरट्यांनी नेमकी ही संधी साधली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय देवरे करीत आहे.
