सावखेडासीमच्या तरुणाला मारहाण : आठ संशयीतांविरोधात गुन्हा
Sawakhedasim youth assault: Crime against eight suspects यावल : तालुक्यातील सावखेडासीम या गावात स्टेट बँकेच्या जवळ आठ जणांनी एका 33 वर्षीय तरुणाला घरात जाऊन मारहाण करण्यात आली तसेच तरुणाच्या पत्नीला शिविगाळ करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाच्या वादातून मारहाण
सावखेडासीम येथील संकेत निवृत्ती किरंगे (33) या तरुणाने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गावात तो स्टेट बँकेच्या जवळ वास्तव्यास आहे. त्यांच्या घरात लग्नाच्या वादातून सुनील राजाराम बडगुजर, योगिता सुनील बडगुजर, अमोल अनिल बडगुजर, डिगंबर सुनील बडगुजर, लक्ष्मण गना बडगुजर, सुरेखा बापू बडगुजर, नीलिमा अंबादास चव्हाण व अंबादास धोंडू चव्हाण (सर्व राहणार सावखेडासीम) यांनी त्यांना मारहाण केली व त्यांची पत्नी पूजा संकेत किरंगे यांनादेखील शिवीगाळ केली व घराचा लोखंडी दरवाजा तोडून नुकसान केले. या प्रकरणी सर्व आठ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.
