बसमधील गर्दीचा फायदा घेत जळगावात महिला प्रवाशाची लाखाची पोत लांबवली


Taking advantage of the crowd in the bus, the woman passenger was dragged to Jalgaon जळगाव : बसमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी झाल्याची संधी चोरट्याने साधत वृद्ध महिला प्रवाशाची सुमारे चार तोळे वजनाची व जुन्या भावानुसार एक लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. ही धक्कादायक घटना जळगाव बसस्थानकात सोमवारी सकाळी 9.10 वाजेच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गर्दीचा फायदा घेत केली चोरी
जालना येथील लीलादेवी जयप्रकाश रुणवाल (71, आदित्य कॉम्प्लेक्स, जालना) या वृद्ध महिला पती, नणंद सविता अच्छा, मुलगा व सूनेसोबत गुरुवार, 20 एप्रिल रोजी देवदर्शनासाठी गेल्यानंतर परतीच्या प्रवासात भाचा रीतेश छोरिया याला भेटण्यासाठी रविवार, 23 रोजी जळगावात आल्या व दुसर्‍या दिवशी सोमवार, 24 एप्रिल रोजी सकाळी 9.10 वाजेच्या सुमारास रुणवाल या जालना जाण्यासाठी नवीन बस स्थानकात आल्यानंतर यावल-लातूर बस (एम.एच.20 बी.एल.3763) मध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील चार तोळे वजनाची व एक लाख रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. रुणवाल यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला नाईक भारती देशमुख करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !