जळगावातील अट्टल घरफोडे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Attal house burglaries in Jalgaon caught by MIDC police जळगाव : कुविख्यात चोरट्यासह त्याच्या दोन साथीदारांना जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून अनेक चोर्यांसह घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोहसीन खान नूर खान (रा.गेंदालाल मिल, जळगाव) व ईस्माईल उर्फ राजू शेख शब्बीर (रा.साहिल किराणा मागे, गणेशपुरी, मास्टर कॉलनी, मेहरुण, जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे असून एक अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्या आले आहे.
सुप्रीम कॉलनीतील घरफोडीची उकल
गुरुवार, 20 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास सुप्रीम कॉलनी भागातील मन्नत बंगला परीसरातील रहिवासी मोहम्मद अवेस अब्दुल सत्तार हा तरुण घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेल्याची संधी चोरट्यानीं साधली होती.बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटाच्या तिजोरीतील एक लाख 92 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
घरफोडी करणार्या संशयीतांबाबत पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. एएसआय अतुल वंजारी, हवालदार गणेश शिरसाळे, नाईक इम्रान सैय्यद, सुधीर सावळे, सचिन पाटील, योगेश बारी, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे आदींनी मोहसीन खान नूर खान (रा.गेंदालाल मिल, जळगाव) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने घश्रफोडी कबुल करीत साथीदार ईस्माईल उर्फ राजु शेख शब्बीर याचे नाव सांगितले याशिवाय या गुन्ह्यात एका अल्पवयीन साथीदाराचा देखील सहभाग असल्याचे कबुल केल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. अटकेतील दोघांच्या ताब्यातून 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संशयितांना 26 पर्यंत पोलीस कोठडी
अटकेतील दोघांना संशयीतांना न्या.जे.एस.केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अॅड.स्वाती निकम यांनी युक्तीवाद केला.


