जळगावात माहेरी निघालेल्या विवाहितेची 42 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवली


In Jalgaon, the purse of the married woman who left for home was extended with 42 thousand जळगाव : पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे माहेरी जाण्यासाठी निघालेल्या कविता जिभाऊ पाटील (रा. राणमाळा, पोस्ट तिखी, ता.जि.धुळे) या विवाहितेची बसमध्ये चढताना चोरट्यांनी पर्स लांबवली. सोमवारी सकाळी 11.30 वाजता ही घटना या पर्समध्ये 42 हजारांचे दागिणे होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बसमध्ये चढताना पर्स लांबवली
कविता पाटील यांचे राणीचे बांबरूड येथील माहेर असून माहेरी जाण्यासाठी सोमवारी सकाळी 9 वाजता धुळे-जळगाव बसने प्रवास करून शहरातील नवीन बसस्थानक येथे सकाळी 11.30 वाजता उतरल्या. नंतर त्या जळगाव-पाचोरा बसमध्ये चढल्या. याच दरम्यान गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने त्यांची लहान पर्स लांबवली. या पर्समध्ये साडेचार हजारांची रोकड, सोन्याचा नेकलेस, कानातील लटकन होती. पाटील या बसमध्ये बसल्यानंतर त्यांना मोठ्या पर्सची चेन उघडी दिसली व चोरट्याने त्यातून लहान पर्स लांबवल्याचे लक्षात आले. पर्स चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक पल्लवी मोरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !