किक्रेट खेळण्याच्या वादातून जळगावात तरुणाला बेदम मारहाण
जळगाव : शहरातील शिवकॉलनी परीसरातील मैदानावर किक्रेट खेळण्यातून वाद वाढताच दोघांनी लाकडी काठी तसेच चापटाबुक्क्यांनी तरुणाला मारहाण केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील शिवकॉलनी येथे लोकेश संभाजी शिंपी (19) हा तरुण वास्तव्यास असून रविवार, 23 एप्रिल रोजी लोकेश हा त्याच्या मित्रांसह शिवकॉलनी परीसरातील मारुती पार्कच्या समोरील मैदानावर क्रिकेट खेळत होता. यादरम्यान या मैदानावर मोहित साळुंखे, राज जगताप असे दोघे आल्यानंतर लोकेशने आमची मॅच संपली की तुम्ही पुढची मॅच खेळा, असे सांगितल्याचा राग आल्याने दोघांनी लोकेश शिंपी यास शिविगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यात एकाने लाकडी काठीने लोकेशच्या उजव्या डोळ्याजवळ मारहाण करुन दुखापत केली. या प्रकरणी लोकेश याने दुसर्या दिवशी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून मोहित साळुंखे, राज जगताप (दोघे रा. शिवकॉलनी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.


