जळगावात कौटुंबिक वादानंतर तरुणाला मारहाण : चौकडीविरोधात गुन्हा
Youth beaten up after family dispute in Jalgaon: Crime against quartet जळगाव : शहरातील उस्मानिया पार्क येथे भाच्याला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली तसेच लोखंडी पट्टी डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सोमवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
तौसीफ शेख सलीम काकर (32, पोलीस कॉलनी, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. मयत झालेल्या चुलत बहिणीच्या मुलांना भेटण्यासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता तौसिफ उस्मानिया पार्क येथे गेल्याने त्याचा राग येवून शरीफ रहेमान काकर (तांबापूरा), भिकन सलीम काकर, शाहरूख उर्फ गुड्डू सलिम काकर, आणि सलिम नजिर काकर (सर्व रा.उस्मानिया पार्क) यांनी तौसीफला बेदम मारहाण केली. यातील एकाने लोखंडी पट्टी डोक्यात टाकल्याने तौसिफ गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तौसिफने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शरीफ रहेमान काकर (तांबापुरा), भिकन सलीम काकर, शाहरूख उर्फ गुड्डू सलिम काकर, आणि सलिम नजीर काकर (सर्व रा. उस्मानिया पार्क) यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहे.


