शिविगाळ करू नका सांगितल्याच्या रागातून जळगावात महिलेला मारहाण : तिघांविरोधात गुन्हा


Woman beaten up in Jalgaon out of anger for being told not to abuse : Crime against three जळगाव : घरी पाहुणे आले आहेत, शिविगाळ करू नका, असे सांगितल्याच्या रागातून त्रिकूटाने महिलेच्या दगड डोक्यात दगड मारत विवाहितेच्या पतीला शिवीगाळ करीत धमकी दिली. ही घटना पिंप्राळ्यातील हुडको भागात सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
पिंप्राळा हुडकोत बौध्द वसाहतीत सरला संतोष बोरसे (28) या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 23 एप्रिल रोजी बोरसे यांच्याकडे पाहुणे आले होते व मोठ-मोठ्याने बोलण्याचा आवाज येत असल्याने सरला बोरसे यांनी गल्लीतील अनिल भगवान सोनवणे ऊर्फ मारी यांना उद्देशून आमच्या घरी पाहुणे आले असून शिविगाळ करुन नका तसेच मोठमोठ्याने बोलू नका असे सांगितल्याचा राग आल्याने अनिल सोनवणे याने सरला बोरसे यांच्या कपाळावर दगड मारुन दुखापत केली तर भगवान सोनवणे व सुमन सोनवणे यांनी सरला बोरसे यांचे पती संतोष बोरसे यांना शिवीगाळ करत काय करायचे ते कर, आम्ही पोलिसांना घाबरत नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी सरला बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनिल भगवान सोनवणे उर्फ मारी, भगवान सोनवणे, सुमन सोनवणे (तिन्ही रा.बौध्द वसाहत, पिंप्राळा हुडको) या तिघांविरोधात रामनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !