जळगाव शहरात मारहाण करीत दुकानदाराला लुटले


A shopkeeper was beaten and robbed in Jalgaon City जळगाव : पिंप्राळ्यातील मढी चौकाजवळ दुकानदार महेंद्र रामलाल कोंडे (38, रा.धनगरवाडा, पिंप्राळा) या तरुणाला सात संशयीतानी मारहाण करीत लुटल्याची घटना सोमवारी रात्री 10.30 वाजता घडली. संशयीतांनी सोन्याची अंगठी व एक हजार रुपये लांबवले. या प्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल
महेंद्र कोंडे हे सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून पिंप्राळ्यातील भवानी मंदिरकडून मढी चौक मार्गे पायी घरी जात असताना मढी चौकात आल्यानंतर त्यांनी सात जणांनी रस्त्यात अडवून एकाने त्यांना तुझ्या खिशात किती पैसे आहे, ते सगळे काढ असे, सांगितले. पण, कोंडे यांनी त्यांचा विरोध केल्यानंतर काहींनी त्यांना पकडून ठेवले. नंतर एकाने त्यांच्या खिशातील एक हजार रूपये रोख तर दुसर्‍याने हातातील 21 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. त्यानंतर त्यांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !