जळगावातील दुकानदाराला लुटणारे संशयीत जाळ्यात


Suspect of robbing a shopkeeper in Jalgaon जळगाव : पिंप्राळा मढी चौकात दुकानदार तरुणाचा रस्ता अडवत मारहाण करून लूट झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली होती. या प्रकरणी मंगळवार, 25 एप्रिल रोजी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीतांना अटक करण्यात आली.

सात संशयीतांना अटक
महेंद्र रामलाल कोंडे (38, धनगरवाडा, पिंप्राळा, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. सोमवार, 24 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता महेंद्र हा पिंप्राळा येथील मढी चौकातून जात असतांना विशाल कोळी, नितेश उर्फ गोल्या जाधव, राकेश जाधव, सचिन चव्हाण, रॉनी सपकाळे, राहूल खवडे यांनी रस्ता आडविला. महेंद्रला धमकी देत त्याच्या जवळील सोन्याची अंगठी आणि रोकड असा 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला होता शिवाय पोलिसात तक्रार दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने रामानंदनगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर आरोपी विशाल कोळी, नितेश उर्फ गोल्या जाधव, राकेश जाधव, सचिन चव्हाण, रॉनी सपकाळे, राहूल खवडे यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपींना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !