जळगावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले
A minor girl from Jalgaon was seduced and abducted जळगाव : जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील एका भागातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अज्ञाताविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परीसरातील एका भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. रविवार, 23 एप्रिल रोजी अल्पवयीन मुलगी घरी असतांना तिला अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. उशीर होवून मुलगी घरी परत न आल्यावर तसेच कुठेही ती मिळून न आल्याने दोन दिवसानंतर मंगळवारी तिच्या कुटुंबियांनी तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी मुलीचे वडील यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण मोताळे करीत आहेत.


