चोरीच्या 31 सायकलींसह चोरटा जळगाव रामानंद पोलिसांच्या जाळ्यात
Thief with 31 stolen bicycles caught by Jalgaon Ramanand police जळगाव : शहरात सुरू असलेल्या सायकल चोरीच्या सत्रात रामानंद पोलिसांनी मोठी कारवाई करीत एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 31 चोरी केलेल्या सायकली जप्त केल्या आहेत. जयेश अशोक राजपूत (22, मयुर कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गिरीश गोविंदा खैरकर (22, गणेश पार्क शिवकॉलनी, जळगाव) या तरुणाची सायकल 21 डिसेंबर 2022 रोजी सायकल चोरी गेल्याप्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांना सायकल चोरीचे गुन्हे जयेश अशोक राजपूत (22, पिंप्राळा, जळगाव) करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवार, 21 रोजी अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीच्या एकूण 31 सायकली काढून दिल्या.
यांनी केली कारवाई
ही कारवाई रामानंद पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, रेवानंद साळुंखे, रवींद्र चौधरी, राजेश चव्हाण, विजय खैरे, अतुल चौधरी, उमेश पवार, ईश्वर पाटील, अनिल सोननी, दीपक वंजारी आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार सुशील चौधरी व विजय खैरे करीत आहे.


