12 लाखांचे दागिणे हिसकावले : जळगावातील वकिलासह तिघांना अटक


Jewelery worth 12 lakhs seized: Three arrested including a lawyer from Jalgaon जळगाव : पुतण्याला मारहाण करीत घरातील 12 लाख 40 हजार रुपये किंमतीच सोन्याचे दागिने जबरी हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर जळगावातील अ‍ॅड.विजय पाटील यांच्यासह त्यांचे बंधू मनोज व संजय पाटील यांना जिल्हापेठ पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

जिल्हापेठ पोलिसात दाखल आहे गुन्हा
पियुष नरेंद्र आण्णा पाटील यांच्या फिर्यादीनुसार पियुषचे वडील नरेंद्रआण्णा पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या बँकेतील लॉकर हे बंदच होते. त्या लॉकरमध्ये पियुषच्या आईचे दागिने होते. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर पियुष हा काका संजय भास्कर पाटील यांच्या सोबत बँकेत गेला. कागदपत्रे दिल्यानंतर 11 ऑक्टोंबर 2022 रोजी दुपारी 12 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने व महत्वाची कागदपत्रे घरी आाणल्यानंतर तळमजल्यावर वास्तव्यास असलेले काका अ‍ॅड.विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलजा नेरंद्र गांगुर्डे यांनी संगनमत करून पियुष जवळील सोन्याचे दागिने जबरी हिसकावून बेदम मारहाण केली. पियुषची आई ज्योती यांना अश्लिल शिवीगाळ करण्यात आली वारंवार दागिने मागितले असता दागिन्यांशी तुमचा काहीही संबंध नाही, दागिने विसरून जा असे सांगून धमकावले.

याप्रकरणी अखेर सहा महिन्यानंतर पियुष पाटील याने बुधवार, 26 एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अ‍ॅड.विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलजा नेरंद्र गांगुर्डे यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मदत घेत अ‍ॅड.विजय पाटील यांच्यासह त्यांच्या दोघा भावांना अटक करण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !