50 हजारांची लाच भोवली : शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरीष्ठ लिपिकासह शिक्षक जाळ्यात


50,000 bribe :  A senior clerk in the office of the Deputy Director of Education, along with a teacher in the net नागपूर : शाळेतील वर्गवाढीसाठी लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सुनील महादेवराव ढोले (52) व शिक्षक पवन ईश्वर झाडे (44) यांना एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

50 हजारांची लाच मागितली
चंद्रपूर येथील पोद्दार स्कूलच्या शाळेचे प्रतिनिधी असलेल्या एका व्यक्तीने शाळेतील वर्गवाढीसाठी प्रस्ताव पाठविला होता. वर्ग सहावी ते दहावीपर्यंत वर्गवाढ करण्याबाबतचा संबंधित प्रस्ताव होता व तो शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. या प्रस्तावावर शिफारस करण्यासाठी लिपीक ढोले याने तक्रारदाराला 50 हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याचे ठरले व त्याच्या वतीने पवन झाडे हा पैसे घेईल, असे ठरले.






लाच घेताच अटक
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला व आरोपीला 50 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याची झाडाझडती घेण्यात आली असता त्याने वरिष्ठ लिपीकाचे नाव सांगितले. एसीबीच्या पथकाने दोघांविरोधातही गुन्हा नोंदविला आहे. उपअधीक्षक संदीप जगताप, पोलीस निरीक्षक उज्वला मडावी, पंकज घोडके, सचिन किन्हेकर, कांचन गुलबसे, शारीक शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !