नाशिकमधील सिडको भागात डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून तरुणाची हत्या


A young man was killed by throwing a paver block on his head in CIDCO area of Nashik नाशिक : सिडको भागातील सावता नगर भागातील हॉटेल प्रयांशीमध्ये टोळक्याने तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. परशूराम बाळासाहेब नजान (25, रा.पाथर्डी फाटा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सिडको भागात झालेल्या खुनाने सिडको परीसर हादरला आहे.

खुनानंतर धक्कादायक कारण समोर
इंस्टाग्रामवर लाईव्ह करुन शिवीगाळ केल्याच्या कारणातून मित्रांचे भांडण झाले. हे भांडण सोडवायला गेल्यानंतर परशूराम या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास करून 9 जण ताब्यात घेतले असून यात 6 जण हे अल्पवयीन आहेत. घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धाव घेत संशयीतांच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके पाठवली आहे.






टोळी युध्दाची दुसरी घटना
दहा दिवसात सिडकोत मागील रविवार, 16 रोजी गोळीबार करून राकेश कोष्टी याला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा खुनाचा प्रकार समोर आल्याने सिडकोवात्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !