वरणगाव शहरात मध्यरात्री बकर्या चोरताना दोघांना पकडले
Two were caught stealing goats in the middle of the night in Warangaon town भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील रामपेठ, वैदूवाडा भागात मध्यरात्री बकर्या चोरट्यांना नागरीकांनी रंगेहाथ पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. अनुराग लक्ष्मण सुनगत व राज विजय वाकोडे (रामपेठ, वरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
बकर्यांच्या आवाजाने मालकाला आली जाग
मंगळवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तक्रारदार श्रावण प्रल्हाद गुमळकर (37, वैदुवाडा, वरणगाव) यांच्या मालकिच्या चार बकर्या व सात पिल्लांची चोरी होत असतानाच आवाज आल्याने गुमळकर यांना जाग आल्यानंतर त्यांनी पाठलाग करीत संशयीतांना पकडत पोलिसांना माहिती दिली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.
