पत्ते खेळू नका म्हटल्याच्या वादातून भानखेड्यात तरुणाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


A young man was beaten up in Bhankheda over a dispute over saying not to play cards : Crime against four

भुसावळ : पत्ते खेळू नका म्हटल्याच्या वादातून तालुक्यातील भानखेडा येथील मरीमाता चौकात 21 वर्षीय तरुणाला चौघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 21 रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. या प्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्‍या गटानेही याप्रकरणी तक्रार दिल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
गोकुळ संजय पाटील (21, भानखेडा) या तरुणाच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास येथे पत्ते खेळू नका, असे संशयितांना सांगितल्याने त्याचा राग येवून संशयितांनी शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच दगडाने मारहाण केली तसेच हातातील बैलगाडीचे रुमणे कानावर मारल्याने तरुण जखमी झाला. या प्रकरणी संशयित देविदास आनंदा पाटील, मना देविदास पाटील, पंकज देविदास पाटील व मधा दिलीप पाटील (सर्व रा.जोगलखेडा) यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

परस्परविरोधी तक्रार
देविदास आनंदा पाटील (55, जोगलखेडा) यांच्या तक्रारीनुसार, काही कारण नसताना संशयित गोकुळ संजय पाटील व त्याच्या सोबतच्या अन्य दोघा अनोळखींनी दारूच्या नशेत धारदार वस्तूने उजव्या बोटाला व डोळ्याच्या बाजूला दुखापत केली तसेच छातीवर व पोटावर मारहाण करण्यात आली. ही घटना जोगलखेडा येथे शुक्रवार, 21 रोजी रात्री आठ वाजता घडली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार संजय भोई करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !