दुचाकीवरून पडलेल्या चाळीसगावातील महिलेचा मृत्यू
चाळीसगाव : स्कूटीवरून घराकडे निघालेली महिला दुचाकीवरून पडल्याने जखमी झाली होती. उपचार सुरू असताना महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संगीता नथ्थू पाटील (58, वाकडी, ता.चाळीसगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील रहिवाशी संगीता पाटील या आपल्या नातेवाईकांसोबत स्कुटीने प्रवास करत असतांना अपघात झाल्यानंतर जमिनीवर पडताच त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र मंगळवार, 25 एप्रिल रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक संदीप माने करीत आहे.


