देव्हारीतील शेतकरी तरुणाची नापिकी व कर्जबाजारापणाला कंटाळत आत्महत्या


A farmer in Dewari commits suicide after being fed up with barrenness and indebtedness जळगाव : जळगाव तालुक्यातील देव्हारी गावातील 24 वर्षीय तरुणाने सततची नापिक व कर्जबाजारीपणापुढे हात टेकत घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी सा वाजता घडली आहे. अमोल अरुण पाटील (24, देव्हारी, ता.जळगाव) असे मयत झालेल्या तरूण शेतकर्‍याचे नाव आहे.

कुटूंंबाचा आक्रोश मन हेलावणारा
अमोल पाटील हा आई कल्पना यांच्यासोबत वस्तव्याला होता. शेती करून तो आपला उदरनिवाह करीत होता. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेली सततची नापिकीमुळे तो चिंतेत होता. शिवाय शेती करण्यासाठी काढलेले सोसायटीचे कर्ज आणि सावकारी कर्ज काढलेले होते. पिकांच्या नुकसानीला कंटाळून अमोलने बुधवार, 26 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी आई कल्पनाबाई पाटील या घरी आल्या तेव्हा त्यांनी मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. शेजारी राहणार्‍या ग्रामस्थ व तरूणांनी मृतदेह खाली उतरवून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत अमोलच्या पश्चात आई कल्पनाबाई आणि विवाहित बहिण रुपाली असा परीवार आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !