रावेर शहरात विवाहितेने दिला तिळ्या मुलांना जन्म
माऊली रुग्णालयात नॉर्मल डिलिव्हरी : नवजात अर्भकांना पाहण्यासाठी गर्दी
The married woman gave birth to three children in Raver city रावेर : शहरातील माऊली हॉस्पिटलध्ये विवाहितेने तीन मुलांना (तिळ्यांना) जन्म दिल्याची सुखद घटना गुरुवारी सकाळी घडली. विशेष म्हणजे तीन्ही मुलांसह आईची प्रकृती उत्तम असून स्त्रीरोग तज्ञ डॉ.संदीप पाटील यांनी नॉर्मल डिलीव्हरी केली आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी पहिले तर 10.50 व 10.55 ला दुसर्या व तिसर्या बाळाला कविता राजकुमार कापडे या विवाहितेने जन्म दिला.
नातेवाईकांनी मानले आभार
कविता कापडे ही मध्यप्रदेशच्या लालबाग, बर्हाणपूर येथील रहिवासी असून बहादरपूर येथील त्यांचे माहेर आहे. डॉ.संदीप पाटील यांनी अतिशय गुंतागुंतीची प्रसुती नॉर्मल केल्याने मुलांचे वडिल राजकुमार कापडे व त्यांच्या नातेवाईकांनी डॉ.पाटील यांचे आभार मानले. डॉ.योगीता पाटील यांनी जन्माला आलेल्या बाळांची तपासणी करून सर्वाची योग्यती जन्म पश्चात काळजी घेतली आहे. बातमी वार्यासारखी रावेर शहरात पसरल्यानंतर माऊली हॉस्पिटलमध्ये या बाळांना पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
नवजात अर्भकांना पाहण्यासाठी गर्दी
मध्यप्रदेशातील बर्हाणपूरजवळील लालबाग येथील कविता कापडे या विवाहितेने गुरुवारी पाच-पाच मिनिटांच्या अंतराने तीन मुलांना जन्म दिला आहे. मुलांना पाहताच कापडे कुटूंबाच्या आनंदाला पारावर उरला नाही.
