कृउबा निवडणूक : एकापेक्षा जास्त मतदारसंघात करता येईल मतदान


Kuruba Election: Voting can be done in more than one constituency भुसावळ : कृउबा निवडणूक शुक्रवारी होत असतानाच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघाचे अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदाराला मतदानाची मुभा दिली आहे. यापूर्वी केवळ एकाच ठिकाणी मतदाराला मतदानाची मुभा होती मात्र आता ज्या मतदारसंघाच्या अंतिम यादीत नाव असल्यास तेथे मतदान हक्क बजावणार आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर हे आदेश काढण्यात आले असून 26 रोजी काढलेले आदेश रद्द करण्यात आले असून गुरुवारी नव्याने आदेश काढण्यात आले आहेत.

जुना आदेश अखेर रद्द
एका मतदाराचे नाव एकाच मतदार संघाच्या अंतिम मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळेस समाविष्ट झाल्यास संबंधित मतदारास संबंधित मतदारसंघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतकेच मतदान करता येणार असल्यामुळे मतदारास एकाच वेळी मतदान करता येत होते. बुधवार, 26 एप्रिल 2023 रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हे आदेश काढत 24 तासात मागे घेतले.

आमदारांच्या पाठपुराव्याला आले यश
आमदार शिरीष चौधरी व लोकप्रतिनिधी व सहकारातील जाण्यात नेत्यांनी जिल्हा उपनिबंधक, जळगाव व निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त, पुणे यांच्याशी संपर्क करून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली. याबाबत दखल घेऊन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी 26 एप्रिल चा आदेश रद्द करून गुरुवार, 27 एप्रिल 2023 चा नवीन आदेश काढला. त्यानुसार एका मतदाराचे नाव एकाच मतदार संघाच्या अंतिम यादीत एकापेक्षा जास्त वेळेस समाविष्ट झाल्यास संबंधित मतदरास त्या-त्या मतदार संघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतके मतदान करता येणार आहे. संबंधित मतदारास एकाच वेळी मतदान करता येईल. एका मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदार संघाचे अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदारास त्या-त्या मतदारसंघात मतदारसंघाच्या वतीने निवडल्या जाणार्‍या सदस्यांच्या संख्येइतके मतदान करता येणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !