भुसावळ बाजार समितीसाठी पहिल्या दोन तासात 44 टक्के मतदान

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला : उद्या जाहीर होणार निकाल


44 percent polling in first two hours for Bhusawal Bazar Committee भुसावळ : कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांसाठी 38 उमेदवार रींगणात असून शुक्रवार, 28 रोजी निवडणूक होत आहे. कृउबाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच मोठी चुरस निर्माण पहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत टोकाचे मतभेद असलेले आमदार एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी हे एकत्र आले आहेत तर भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनीदेखील आपली शक्ती पणाला लावली आहे. जामनेर रोड अहिल्यादेवी कन्यायालयात चार बुथमध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी आठ ते दहा या वेळेत 44 टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

560 मतदार करणार मतदान
कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 560 मतदार आपला हक्क बजावतील. त्यात सेवा सहकारी मतदार संघातून 168, ग्रामपंचायत 226, व्यापारी 117, हमाल मापाडी 49 मतदार हक्क बजावतील. एका केंद्रावर साधारण चार सहकार अधिकारी निवडणूक प्रक्रिया सांभाळतील तर बॅलेट पेपरद्वारे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

उद्या होणार मतमोजणी
कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शनिवार, 29 रोजी शहरातील डॉ.बी.व्ही.खाचणे हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल तर चार तासात निकाल लागण्याची शक्यता आहे. चार टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया होणार असून चार सहकार अधिकारी व दोन कर्मचारी यावेळी नियुक्त असतील. निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी प्रशांत वीरकर व सहा.निवडणूक अधिकारी अयुब तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.

पहिल्या दोन तासात 44 टक्के मतदान
सकाळी आठ ते दहा या वेळेत विकासो गटातील 168 पैकी 97, ग्रामपंचायत 226 पैकी 79, व्यापारी 117 पैकी 58, हमाल मापाडी गटात 49 पैकी 10 अशा एकूण 244 मतदारांनी हक्क बजावला. त्याची टक्केवारी सुमारे 44 टक्के इतकी आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !