जळगावात तरुणाला मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा
जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा परीसरातील भिलाटी भागात किरकोळ कारणावरून तरुणाला शिविगाळ करून बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी गुरुवार दुपारी 12 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
शोएब शेख अमन शेख (23, भिलाटी, तांबापूरा, जळगाव) हा तरुण आपल्या परीरवारासह वास्तव्याला आहे. गुरुवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शेएब हा अंगणात उभा असतांना काय झाले ? अशी विचारणा त्याने केल्याच्या रागातून मनोज गायकवाड, मुकेश हटकर, गौरी हटकर (सर्व रा. भिलाटी परीसर, तंबाखू, जळगाव) यांनी बेदम मारहाण केली तसेच पाठीवर कुंडी मारून दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.


