चाळीसगावातील तरुणीवर बलात्कार ; लग्नही मोडले : छत्रपती संभाजीनगराच्या तरुणाविरोधात गुन्हा


Rape of young woman in Chalisgaon ; Marriage also broke: Crime against youth of Chhatrapati Sambhajinagar चाळीसगाव : शहरातील 23 वर्षीय तरुणीशी लग्नाच्या आमिषाने जवळीक निर्माण करून तरुणाने शारीरीक संबंध ठेवले व नंतर तरुणीचा संशयिताशी साखरपूडा झाल्यानंतर दुचाकीसह एक लाखांची मागणी करण्यात आल्याने साखरपूडा रद्द झाला व तरुणीने दुसरीकडे विवाह केला मात्र त्यानंतरही संशयिताने तरुणीचा पिच्छा सोडला नाही. तरुणीच्या पतीला फारकत देण्यास भाग पाडले व त्यानंतरही तरुणीवर तिच्या घरासह संशयिताच्या घरी 2019 पासून वेळोवेळी तसेच 3 मार्च 2022 च्या दहा दिवसापर्यंत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजी नगर येथील संतोष कचरू गुंजाळे (छत्रपती संभाजीनगर) याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

विवाह मोडत पुन्हा केला अत्याचार
शहरातील एका भागातील 23 वर्षीय पिडीतेचा संशयित संतोष गुंजाळे याच्याशी साखरपूडा झाला व त्यावेळी संशयिताने लग्नाच्या आमिषाने तरुणीशी संबंध ठेवले मात्र साखरपूड्यानंतर तरुणाने एक लाख रुपये व दुचाकीची मागणी केल्याने सारखपूडा रद्द करण्यात आला व तरुणीचे दुसर्‍या दिवशी ठिकाणी विवाह झाला मात्र संशयित तरुणाने तरुणीच्या पतीला धमक्या देत तिला फारकती देण्यास भाग पाडले व पुन्हा लग्नाचे तरुणीला आश्वासन देत तिचा विश्वास मिळवत 3 मार्च 2022 रोजी वेरूळच्या महादेव मंदिरात फुलांची माळ टाकून तिला संशयिताच्या घरी नेले व तिथे पुन्हा अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा तरुणीकडे हुंड्याची मागणी करण्यात आली व तरुणाने दुसर्‍या तरुणीशी विवाह करून तरुणीची फसवणूक केली. या प्रकरणी पिडीतेने न्यायालयात धाव घेत तक्रार दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !