जळगावातील सत्यम पार्कमध्ये धाडसी घरफोडी : 72 हजारांचा ऐवज लंपास
Daring burglary in Satyam Park in Jalgaon : 72 thousand instead of loot जळगाव : जळगाव शहरातील सत्यम पार्कमध्ये तरुणाचे बंद घर फोडून चोरट्यांनी 72 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी गुरुवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना पर्वणी
अशोक सुरेश जोहरे (34, सत्यम पार्क, आव्हाने शिवार, जळगाव) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 23 एप्रिल दुपारी 3 ते 27 एप्रिल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान अशोक जोहरे याचे घर बंद होते. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घेत कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 72 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार गुरुवार, 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता समोर आला. अशोक जोहरे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव करीत आहे.


