चेन्नईच्या प्रवाशाची बॅग लांबवली : बर्हाणपूरचे दोघे आरोपी जाळ्यात
भुसावळ : चेन्नई ते जोधपूर (नाकोडा) प्रवास करणार्या प्रवाशाची बॅग रेल्वे ्रवासात जळगाव रेल्वे स्थानकावरून चोरट्यांनी लांबवल्याची घटना 16 नोव्हेंबर 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी बर्हाणपूरच्या दोघा चोरट्यांच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयीत आरोपी सरवर हुसेन उर्फ छोटू अनवर हुसेन (28, घर नं.18/1, हमीदापूर, बर्हाणपूर) व इम्रान मीर शौकत मीर (34, घर नं.18/1, वॉर्ड नंबर 24, आलम मार्ग, लोहार मंडी, बर्हाणपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुन्ह्यातील दोन हजार 800 रुपये काढून दिले आहेत. तक्रारदार अशोक कनराज कोठारी (54, रा.30 बीएआर, 67 कलाटी अपार्टमेंट, चुलैई, चेन्नई) हे 16 नोव्हेंबर 2019 रोजी अप 12656 नवजीवन एक्स्प्रेसच्या कोच बी-1 मधील बर्थ क्रमांक 11-15 वरून प्रवास करीत असताना जळगाव रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर ते पाणी पिण्यासाठी उतरताच चोरट्यांनी त्यांची बॅग लांबवली. या बॅगेत आठ हजारांची रोकड व कागदपत्रे होती. या प्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल केला होता. लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयकुमार कोळी व एएसआय मधुकर न्हावकर यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपास हवालदार नितीन पाटील करीत आहेत.


