मुक्ताईनगर कृउबासाठी 98 टक्के मतदान


भुसावळ : मुक्ताईनगर कृउबासाठी शुक्रवारी 98 टक्के मतदान झाले. 18 जागांसाठी 43 उमेदवार रींगणात आहेत. सोसायटी मतदार संघातील 977 पैकी बोदवड येथे 434 मतदारांमधून 371 मतदारांनी तर मुक्ताईनगरात 117 पैकी 113 मतदारांनी हक्क बजावला .

कुर्‍हाकाकोडात 130 पैकी 126 तर उचंद्यात 117 पैकी 100 व वरणगाव 181 पैकी 173 मतदारांनी हक्क बजावला. ग्रामपंचायत मतदारसंघात बोदवडला 312 पैकी 304, मुक्ताईनगरला 174 पैकी 170, कुर्‍हा येथे 220 पैकी 216, उचंदा 147 पैकी 147 व वरणगावला 181 पैकी 177 मतदारांनी हक्क बजावला. व्यापारी 195 मतदारांपैकी 188 तर हमाल-मापाडी 107 पैकी 104 मतदारांनी हक्क बजावला. बोदवड येथे रविवारी सकाळी 10 वाजता अग्रसेन भवनात मतमोजणी होणार आहे. पोलिसांनी निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त राखला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !