वाघोद्यात दुचाकीचा कट लागल्यानंतर एकाला बेदम मारहाण


सावदा : वाघोदा बु.॥, ता.रावेर येथे दुचाकीचा कट लागल्यानंतर वाहन बघून चालवा, असे तक्रारदाराने म्हटल्याचा संशयीताला राग आल्याने त्याने मारहाण करीत शिविगाळ केली तसेच मारहाणीत नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. ही घटना वाघोदा बु.॥ गावातील रमाई नगर गेटजवळ सोमवार, 24 रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडली.

एकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी शामदास सुपडू तायडे (29, रमाईनगर वाघोदा) यांच्या तक्रारीवरून गंभीर बन्सी वाघ (वाघोदा) याच्याविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजीव एकनाथ चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !