रावेर शिवारात मक्याच्या चार्याला आग
रावेर : रावेर शिवारातील मक्याच्या चार्याला अचानक आग लागल्याने सात हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
सात हजारांचे नुकसान
संतोष भावडू महाजन (कराड, 69, बक्षीपूर, ता.रावेर) यांच्या तक्रारीनुसार, रावेर शिवारातील शेत गट क्रमांक 1689 मध्ये बुधवारी सकाळी 11.30 वाजेपूर्वी मका पिकाच्या चार्याला अचानक आग लागली व या आगीत सात हजारांचे नुकसान झाले. तपास नाईक जगदीश पाटील करीत आहेत.
