मध्यप्रदेशातील प्रौढाची विषारी औषध सेवन करीत आत्महत्या
मुक्ताईनगर : मध्यप्रदेशातील प्रौढाने विषारी औषध सेवन केल्याने त्यास मुक्ताईनगर येथे उपचारार्थ हलवण्यात आले असत उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गुरुवारी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शंकर वडू बारेला (55, रतनपूर, ता.झिरण्या, जि.खरेगान, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे. बारेला यांनी काहीतरी विषारी द्रव प्राशन केल्यानंतर त्यांना मुक्ताईनगरात उपचारार्थ हलवण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. तपास नाईक गजमल पाटील करीत आहेत.


