जामनेर तालुक्यातील तोंडापूरमध्ये झाडावर वीज कोसळताच दहा मेंढ्यासह बकर्यांचा मृत्यू
जामनेर : अवकाळी पावसासोबत वीज कोसळल्याने जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे आठ मेंढ्या आणि दोन बकर्यांचा मृत्यू झाल्याने मेंढपाळ कुटूंबावर संकट कोसळले आहे.
झाडावर कोसळली वीज
जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे एका शेतामध्ये नाशिक येथील मेंढपाळ बसलेले आहेत. शुक्रवारी मेंढ्या झाडाखाली होत्या. दुपारी वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पडला. यावेळी शेतामधील लिंबाच्या झाडावर वीज पडल्यामुळे दहा मेंढ्या व दोन बकर्या मृत्यूमुखी पडल्या असून एक लाख वीस हजाराचे नुकसान झाले.
या घटनेमध्ये मेंढपाळ परीवार सुदैवाने बचावला आहे या घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामा करून तत्काळ त्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.


