अमळनेर शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी !


अमळनेर : शहरातील मुंदडा नगर एक जवळील कस्तुराबाग व सोनार नगर परीसरात रात्री दोन ठिकाणी घरफोड्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

घरफोड्या, चोर्‍यांनी नागरीक धास्तावले
शुक्रवार, 28 रोजी रात्री दोन घरफोड्या झाल्या. यात कस्तुराबाग येथील रहिवासी नितेश रोहिदास पाटील (एस.टी.वाहक) यांच्या घराच्या कडी कोंडा तोडून चोरांनी कपाटातील कापडे अस्ताव्यस्त करीत नुकसान केलेे मात्र रोकड, सोने काहीही चोरीला गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. घराच्या बाजूलाच लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत चोर हे रात्री 3.45 वाजता कैद झाले आहे. कल्पना सूर्यवंशी यांच्याही घराचे कडी कोंडा तोडण्यात आला मात्र काहीही चोरी न झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे 27 रोजी ही अमळनेर शहरात भर दिवसा चोरी झाली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !