हॉटेलमध्ये आलेल्या तरुणाचा रस्ता अडवत अंगठीसह रोकड जबरीने लुटली : अमळनेरच्या तिघांविरोधात गुन्हा


अमळनेर : अमळनेर शहरातील राजा गार्डन हॉटेलमध्ये तीन जणांनी जबरी हातातील सोन्याची अंगठी व पाकिटातील रोकड जबरी चोरून नेल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी दोन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हॉटेलमध्ये आल्यानंतर केली लूट
मयूर किशोर गायकवाड (28, विद्यानगर धुळे रोड, अमळनेर) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास मयूर हा अमळनेर शहरातील राजा गार्डन हॉटेल येथे जेवणासाठी गेला होता. जेवण आटपून घरी परतत असताना त्याचा रस्ता अडवून मयूर सजन पाटील (रा. सुरत, गुजरात), विशाल दशरथ चौधरी आणि विजय मधुकर शिंगाणे (दोघे रा.अमळनेर) यांनी हातातील 15 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि खिशातील दीड हजार रुपये असा एकूण 16 हजार 500 मुद्देमाल जबरी चोरून नेला. या संदर्भात मयूर किशोर गायकवाड यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !